About the Author

माझ्याबद्दल थोडंसं…...
शिक्षण:
B. A.( Hon ) संपूर्ण मानसशास्त्र( सेंट झेवियर्स कॉलेज )
B. Lib. Sc. ग्रंथालयशास्त्राच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी मेरीट लिस्टमध्ये नाव
B. Ed. मेरीट लिस्टमध्ये नाव. ऑल राउंड परफॉरमन्ससाठी महाविद्यालयाकडून सन्मानित

कार्यानुभव:
२२ वर्षे अध्यापनक्षेत्रात काम

लेखन:
सत्तर पुस्तके प्रसिद्ध. कथा, कादंबऱ्या, ललित लेखसंग्रह, तत्वज्ञान, कविता, सकारात्मक जीवनदृष्टी वरील अनेक लेखसंग्रह, स्त्रीविषयक लेखसंग्रह,सुधृढ मानसिकतेसाठी हा मानसशास्त्रविषयक लेखसंग्रह, हिंसाचार ते दहशतवाद हे मुलाखती, शब्दांकन, लेखन, व संपादन केलेले पुस्तक, सागरी झेप हे शब्दांकन केलेले पुस्तक, निसर्गायन हा कवितासंग्रह, अनुवादित पुस्तके, बालवाङमयाची अनेक पुस्तके, असे विविधांगी लेखन.

संपादन:
प्रियंवदा मासिकाचे आठ वर्षे सहसंपादन, चारचौघी मासिकाची काही वर्षे कार्यकारी संपादिका नंतर सल्लागार संपादिका, लॉलीपॉप, लाडोबा, ई. बालामासिकांचे काही वर्षे सहसम्पादन, अक्षरभारत या साप्ताहिकात मुलें व महिलांच्या विभागाचे अडीच वर्षे संपादन, जिची तिची कथा या कथाक्लबच्या लेखिकांच्या कथासंग्रहाचे संपादन,मराठी विश्वकोशाच्या कन्याकोश या अंधासाठी काढलेल्या सी. डी. स्वरूपातील कोशाची समन्वयक व नोंद लेखक, सावित्रीच्या लेकी या कोशाची समन्वयक, व संपादन सहाय्य,एस. एन. डी. टी. विश्वविद्यालय प्रकाशित महिलांचे शिक्षण विषयक सूचीचे मराठी विभागाचे संपादन

दृकश्राव्य माध्यम:
मणीमंगळसूत्र या चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन आकाशवाणी व दूरदर्शनसाठी अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण, सूत्रसंचालन

मानसन्मान व पुरस्कार:
लेखनासाठी माहाराष्ट्रराज्य सरकारच्या पुरस्कारांसाहित अनेक पुरस्कार
समग्र साहित्यासाठी कुलाबा महिला विकास मंडळाचा विशेष प्रतिष्ठेचा साहित्य सन्मान पुरस्कार (२०१३)
अंकुर साहित्य संघाच्या गोवा येथील साहित्यासाम्मेलानाचे अध्यक्षपद (२०१४)
शब्दवेल कला साहित्य संस्कृती परिषदेच्या वासी येथील एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१५)
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पनवेल येथे झालेल्या उपनगरी साहित्या संमेलनातील सहभागाबद्दल सन्मान (२०१६)
साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेणारा स्त्री मासिकाचा खास अंक मे २०१२ मध्ये प्रकाशित
महात्मा गांधी विद्यालयातर्फे वांद्रे येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

Comments are closed