हंगामा है क्यौ बरपा

हंगामा है कयौं बरपा
अलीकडे पाउस बोलतो माझ्याशी. माझ्या खोलीला भिंतभर काचेची खिडकी आहे. पाउस पडायला लागला की मी लेखन वाचन बाजूला ठेवून लहान मुलासारखी पाउस बघत बसते. त्यालाही वाटत असेल “बरी आहे रिकामटेकडी जरा गप्पा मारायला.” रिमझिम येतो तेव्हा खिडकी पूर्ण उघडते. त्याच्या थेंबांचा नाजूक शिडकावा चेहऱ्यावर झाला … Continue reading

आला पहिला पाऊस

 

पहिला पाउस

आला पहिला पाऊस

जाई जुई बरसती

मातीमधून हुंकार

समाधानाचे उठती

आला पहिला पाऊस

रुणझुणती चाहूल

थेंबा थेंबांचा वर्षाव

शांत होतसे काहील

आला पहिला पाऊस

कोसळती हिरेमोती

हात पसरून दोन्ही

मुले नाचती खेळती

आला पहिला पाऊस

संगे येती आठवणी

साक्षी ठेवून धारांना

गाईलेली प्रीतगाणी

आला पहिला पाउस

देई … Continue reading

प्रत्येक क्षण आनंदाचा

 

 

 

प्रत्येक क्षण आनंदाचा

भूतकाळ हा मृतकाळ आहे त्यात डोकावून बघू नये असं कितीही म्हटलं तरी वय ज्येष्ठतेनुसार स्मरणरंजन नकळता प्रत्येक घटना प्रसंगाला चिकटलेलं असतं. एरवीही नुसतं बसल्यावर व्यक्तींची, घटना, प्रसंगांची चलतचित्रे मनाचा केव्हा ताबा घेतात कळतही नाही. त्यातही गम्मत अशी असते की त्रासदायक, फजितीचे, चुकांचे, अपमानाचे प्रसंग … Continue reading