हंगामा है क्यौ बरपा

हंगामा है कयौं बरपा
अलीकडे पाउस बोलतो माझ्याशी. माझ्या खोलीला भिंतभर काचेची खिडकी आहे. पाउस पडायला लागला की मी लेखन वाचन बाजूला ठेवून लहान मुलासारखी पाउस बघत बसते. त्यालाही वाटत असेल “बरी आहे रिकामटेकडी जरा गप्पा मारायला.” रिमझिम येतो तेव्हा खिडकी पूर्ण उघडते. त्याच्या थेंबांचा नाजूक शिडकावा चेहऱ्यावर झाला … Continue reading

स्नेहपत्र.

स्नेहपत्र
….. कुटुंबियांकडून……

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छवासाइतके मला निकट क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद आघात आयुष्यातली अधिकउणी
शांताबाई शेळके यांचे हे शब्दांबद्दलचे भाष्य आमची लाडकी माधवी मामी,आजची प्रतिथयश लेखिका माधवी कुंटे हिच्या लेखनसंदर्भात चपखल लागू पडते. मराठी … Continue reading

आला पहिला पाऊस

 

पहिला पाउस

आला पहिला पाऊस

जाई जुई बरसती

मातीमधून हुंकार

समाधानाचे उठती

आला पहिला पाऊस

रुणझुणती चाहूल

थेंबा थेंबांचा वर्षाव

शांत होतसे काहील

आला पहिला पाऊस

कोसळती हिरेमोती

हात पसरून दोन्ही

मुले नाचती खेळती

आला पहिला पाऊस

संगे येती आठवणी

साक्षी ठेवून धारांना

गाईलेली प्रीतगाणी

आला पहिला पाउस

देई … Continue reading