प्रत्येक क्षण आनंदाचा

 

 

 

प्रत्येक क्षण आनंदाचा

भूतकाळ हा मृतकाळ आहे त्यात डोकावून बघू नये असं कितीही म्हटलं तरी वय ज्येष्ठतेनुसार स्मरणरंजन नकळता प्रत्येक घटना प्रसंगाला चिकटलेलं असतं. एरवीही नुसतं बसल्यावर व्यक्तींची, घटना, प्रसंगांची चलतचित्रे मनाचा केव्हा ताबा घेतात कळतही नाही. त्यातही गम्मत अशी असते की त्रासदायक, फजितीचे, चुकांचे, अपमानाचे प्रसंग … Continue reading

नित्यनूतन

नवीन घरात रहायला आल्यावर माझी प्रभात फेरी गच्चीवर करायची असं मी ठरवलं.पहिल्या दिवशी पहाटे वर गेले. आणि चहूकडे नजर फिरवताच पहाटसौंदर्य मनात झरू लागलं. पूर्वेला क्षितीज अबोली रत्नरसात नहात होतं. विरळ ढगांच्या मागे सूर्यबिंब लपलं होतं तरी ढगांमधून किरणांचे झोत प्रस्फुटित होऊन त्यांचा फिकट सोनेरी गुलाबी पिसारा आकाशात पसरला होता … Continue reading

पहिलं दान विठ्ठलाला

 

कित्येक गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात. पण काही केल्या त्या घडतच नाहीत. मला पंढरपूरला जायचं होतं पण तो योग कांहीं केल्या येत नव्हता. वारकरी, त्यांचा “ गजर हरिनामाचा”, त्यांचे विठ्ठल भेटीसाठी आतुरतेने पुढे पुढे जाणारे जथ्थे याबद्दल मला तीव्र कुतूहल होतं. घरदार सोडून त्याच्या नामस्मरणात गुंतून जात, सर्व कष्ट … Continue reading