आला पहिला पाऊस

 

पहिला पाउस

आला पहिला पाऊस

जाई जुई बरसती

मातीमधून हुंकार

समाधानाचे उठती

आला पहिला पाऊस

रुणझुणती चाहूल

थेंबा थेंबांचा वर्षाव

शांत होतसे काहील

आला पहिला पाऊस

कोसळती हिरेमोती

हात पसरून दोन्ही

मुले नाचती खेळती

आला पहिला पाऊस

संगे येती आठवणी

साक्षी ठेवून धारांना

गाईलेली प्रीतगाणी

आला पहिला पाउस

देई वचन तृप्तीचे

भर भरून देईल

दान हिरव्या धनाचे

 

One Comment:

  1. अविनाश ताडफळे

    वाह, सुंदर!

Leave a Reply to अविनाश ताडफळे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *